टाकवे बुद्रुक:
फळणे येथील ठाकरवस्तीचा ट्रान्सफॉर्मर 63 KAV हा गेली मागील चार महिन्यांपासून बंद होता. परिणामी येथील ट्रान्स्फॉर्मर बंद असल्यामुळे कातकरी वस्ती व ठाकर वस्ती वरील बत्ती गुल होती .यामुळे रात्रीच्या वेळी मुलांना अभ्यास करणे तसेच नागरिकांना काही कामानिमित्त घराच्या बाहेर पडणे अवघड होत होते.
तात्पुरती लाईटची सोय दुसऱ्या ट्रांसफार्मर वरून केली गेली होती परंतु त्या ट्रांसफार्मर वरती लोड आल्यामुळे अनेक वेळा बत्तीगुल होत होती त्यामूळे येथील रहिवासी नागरिकांना लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या सर्व गोष्टींची दखल घेऊन महावितरण उप अभियंता शाम दिवटे, वरिष्ठ तंत्रज्ञ राजू दहाट, कर्मचारी गोरख मालपोटे, निहाल पठाण, प्रकाश जगताप यांनी राजगुरुनगर येथील चांडोली डिव्हिजन कडे पाठपुरावा करून नवीन ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध करून घेतला.
या ट्रान्सफॉर्मर वरती कातकरी वस्ती, ठाकर वस्ती यांची लाईट अवलंबून होती लाईट सुरु झाल्यामुळे येथील नागरिकांनी महावितरण वडगाव मावळ यांचे आभार मानले तसेच येथील नागरिकांनी लाईट सुरु झाल्यामुळे समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!