देहू :
येथील सिद्धेश्वर मंदिराजवळील इंद्रायणी नदीत दोन लहान सख्खे भाऊ बुडाले. गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडली.
साहिल विजय गौड(वय.१० ) आणि अखिल विजय गौड (वय .८ रा.सिद्धेईश्वर मंदिर,देहू, मूळगाव गोरखपूर कुशिनगर) असे पाण्यात बुडाल्या मुलांची नावे आहेत नदीच्या काही अंतरावर बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी मुलांचै वडील बिगारी कामगार आहे. सकाळी अंघोळ साठी लहान मुले गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.
अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, पोलिस निरीक्षक प्रताप दळवी, पीएमआरडी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्नीशमन दल घटना स्थळ दाखल झाले आहे असून शोधत सुरू आहे. एनडीआरएफचे पथकही दाखल झाले आहे असून शोध सुरू आहे .

error: Content is protected !!