टाकवे बुद्रुक :
येथे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधानाचे वाचन करणेत आले .
भूषण बंडोबा असवले सरपंच ,ऋषीनाथ पांडुरंग शिंदे माजी उपसरपंच ,अविनाश मारुती असवले माजी उपसरपंच , परशुराम कंकाराम मालपोटे ,ग्रामपंचायत सदस्य संतु पांडू दगडे माजी उपसरपंच, ज्योती दिलीप आंबेकर ग्रामपंचायत सदस्या ,मारुती तुकाराम असवले, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आंदर मावळ, बबन ओव्हाळ , चंद्रकांत वाघमारे ,सुभाष बांगर ग्रामविकास अधिकारी ,हिरामण जाधव,अरुण काटकर उपस्थित होते.
सरपंच भूषण असवले म्हणाले,” भारतरत्न विश्ववंदनीय डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि संविधानाचा आदर व निष्ठा व्यक्त करण्याचा आजचा दिवस .संविधानाचा आदर करणे हेच आपले कर्तव्य आहे.

error: Content is protected !!