कामशेत:
कामशेत पंचक्रोशीतील रूग्णांना दर्जात्मक सुविधा देण्यासाठी खाजगी रुग्णालयात विविध शासकीय योजना राबविण्यासाठी शासनाने अनुकूलता दर्शविली जावी अशी मागणी महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडे केली.
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठया खडकाळयाच्या बाजारपेठेत ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गर्दी असते. आंदर मावळ,नाणे मावळ,पवन मावळातील शेकडो रूग्ण उपचारासाठी कामशेत येथील खाजगी रुग्णालयात येत आहेत.
कामशेत मधील सर्व डाॅक्टर रुग्णसेवेवर निष्ठा ठेवून काम करीत आहे.
कोरोना काळात रुग्णसेवेचा दर्जा कामशेत पंचक्रोशीत चांगला राहिल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून देत,मावळातील आरोग्यसेवेच्या बाबतीत सकारात्मक बाबी मुथा यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून दिल्या.कोरोना काळात आरोग्यमंत्री टोपे यांनी राज्यभर केलेल्या स्तुत्य कामा बद्दल मुथा यांनी आरोग्यमंत्री टोपे यांची कृतज्ञता व्यक्त केली.
कामशेत पंचक्रोशीतील खाजगी दवाखान्यात शासकीय योजना राबविण्या बाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले. यावेळी शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष गणेश भोकरे उपस्थित होते.

error: Content is protected !!