तळेगाव दाभाडे:
‘मावळ शिक्षण प्रतिष्ठान’ संस्थेच्या पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा स्नेहमेळावा येथे संपन्न झाला.
मावळ तालुक्यातील या अग्रगण्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी आमदार सुनिल शेळके यांची निवड झाल्यानंतर हा पहिलाच स्नेहमेळावा होता.
कोरोनाच्या संकटानंतर शाळा पूर्ववत सुरू होत आहेत.शिक्षणाचा मोठा कालावधी वाया गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम करण्यावर आगामी काळात भर द्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे लागतील
असा विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला.
आमदार शेळके म्हणाले,”शैक्षणिक क्षेत्रातील होणाऱ्या बदलांना सामोरे जात असताना संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचा संवाद असणे गरजेचे आहे. संस्थेची मूल्ये जपत गुणवत्तेचा ध्यास घेऊन संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन व पाठबळ नेहमीच असेल.
संस्थेची व संस्थाचलित सर्वच शाळांची पुढील आव्हानात्मक काळात प्रगती होत राहो, शिक्षणासोबत कला,क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर राहून सुसंस्कृत समाज घडवण्यात संस्थेचे महत्वाचे योगदान असावे,अशी अशा आमदार शेळके यांनी व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष.नंदकुमार काळोखे, सचिव यादवेंद्र खळदे, खजिनदार .नंदकुमार शेलार, संचालक ,चंद्रकांत काकडे, प्रा.दत्तात्रय बाळसराफ, वसंत पवार, संजय गांधी समिती सदस्य अजिंक्य टिळे तसेच प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!