वडगाव मावळ:
लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाच्या वतीने आमदार चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगरसेवक संदिप शेळके, माजी सरपंच मनोज येवले , नवनाथ पडवळ, नितीन मुऱ्हे , बाबाजी शेळके , माजी सरपंच युवराज केदारी ,सरपंच अमोल सावळे, माजी उपसरपंच सचिन मुऱ्हे , उपसरपंच उमेश केदारी, माजी सरपंच लहू सावळे, माजी सरपंच नामदेव सावळे, सरपंच अशोक साठे, गणेश वाघोले ,सोमनाथ वाघोले, प्रकाश वरघडे, आढले बुद्रुकचे सरपंच विश्वास घोटकुले, ग्रा पं सदस्य हिरामण येवले ,व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मावळ तालुका राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे अध्यक्ष संजय शेडगे म्हणाले,” लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आमचे दैवत आहे. साहेबांच्या कार्यकिर्दीचा चढता आलेख आम्हा युवकांना प्रेरणादायक आहे. साहेबांचा वाढदिवस आमच्यासाठी पर्वणी आहे. याच अनुषंगाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धा घेऊन तरूणाना व्यासपीठ करून देण्याचा प्रयत्न आहे.

error: Content is protected !!