मळवली:
मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्थानकाचे नाव एकवीरा रेल्वेस्थानक द्यावे असा ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी हा ठराव मांडला आणि सभागृहाने हा ठराव एकमताने मंजूर केला. मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्थानक एकविरा रेल्वे स्टेशन नाव द्यावे हा ठराव मांडण्यापूर्वी नितीन मराठे यांनी या परिसराला लाभलेल्या ऐतिहासिक व धार्मिक वारसा नमूद केला .
नितीन मराठे म्हणाले ,” एकवीरा देवीचे मंदिर हे पांडवकालीन निर्मित आहे .हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज येथे दर्शनासाठी येत. कान्होजी आंग्रे या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत. तमाम महाराष्ट्रवासीयांना श्रद्धास्थान असलेले हे प्राचीन मंदिर जगभर प्रसिद्ध झाले आहे .
या परिसरात लोहगड विसापूर हे किल्ले असून भाजे, कार्ला, पाटण येथे ही लेणी आहेत .स्तूप ,भुयारी लेणी, शिवकालीन व प्राचीन बुद्ध लेणी असा वारसा एकवीरा देवीच्या मूर्तीमुळे मिळाला आहे .भाविकांचे श्रद्धास्थान आई एकविरा असल्याने मळवली रेल्वे स्थानकाचे नाव बदलून एकविरा रेल्वे स्टेशन असे द्यावे या मागणीसाठी आग्रह धरला, आणि हा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मराठे यांनी दिली.

error: Content is protected !!