कामशेत:
उकसानचे उपसरपंच अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दोस्ती करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इलेव्हन संघ तळेगाव हा संघ विजेता ठरला. व पै. संदीप जाधव स्पोर्ट्स फाऊंडेशन वळक हा संघ उपविजेता ठरला.
तृतीय क्रमांक सौरभ पिंपळे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळोली,चतुर्थ क्रमांक संतोष शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन तळेगाव ,पाचवा क्रमांक आकाश माने स्पोर्ट फाउंडेशन यांनी पटकावला. मॅन ऑफ द सिरीज हा किताब आकाश दाभाडे याने मिळवला .अक्षय याला दुचाकी गाडी देऊन गौरविण्यात आले.
आमदार सुनील शेळके, प्रताप बारणे, बाळासाहेब गायकवाड, दीपक हुलावळे,डॉ. विकेश मुथा,गणेश भोकरे भोकरे, गजानन शिंदे, चंद्रकांत ओव्हाळ, अंकुश चव्हाण, काळूराम थोरवे, संतोष कोंढरे,महेश मालपोटे, कैलास कोंढरे, बाळकृष्ण शिंदे ,बाळासाहेब शिंदे ,विलास बांदल ,विजय तिकोने ,दिनेश ठोंबरे, अनिल इंगवले, विकास शिंदे ,संदीप सोनवणे उपस्थित होते .
संकेत सोनवणे ,हर्षद दौंडे ,करण तावरे ,चेतन जाधव यांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!