इंगळूण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
वडगाव मावळ:
आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत इंगळूण ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सुनिता सुदाम सुपे, उपसरपंच अरुणा ठाकर, ग्रामपंचायत सदस्य बबन चतुर, कांताराम तळपे यांच्यासह शशिकांत मदगे, सुदाम सुपे, बाळु सुपे, भिकाजी सुपे, किसन भागित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी संजय गांधी समिती अध्यक्ष नारायणराव ठाकर, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष मारुती करवंदे, विकास ठाकर, प्रशांत काठे, नारायण थरकुडे, बंडू काठे, सचिन मदगे, आदेश चतुर, अशोक करवंदे, नारायण मालपोटे आदि मान्यवर उपस्थित होते.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या या कार्यपद्धतीने प्रभावीत होऊन तालुक्यातील इतर पक्षातील अनेक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँगेस मध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पक्षाची ताकद अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!