लोहगड:
शिवरायांच्या गडकोटांचा वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचावा, त्यातूनच या गडकोटांच्या संरक्षणाचे व संवर्धनाचे बीज त्यांच्या मनामध्ये रुजावे, आपल्या उज्वल इतिहासाबद्दल मनामध्ये अभिमान निर्माण व्हावा, शिवरायांच्या विचारांचा संस्कार घडावा या उद्देशाने टाकवे बुद्रुक गावात भव्य किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित केली होती.


गावातील लहान मुलांना उत्स्फुर्त सहभाग नोंदवला, त्यांना बालवयातच महाराजांच्या किल्ल्यांविषयी आवड निर्माण व्हावी व किल्ल्यांची महती समजावी याच हेतुने स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी किल्ले लोहगड दुर्गदर्शन सहलीचे आयोजन केले. तसेच लोणावळा येथील ऐतिहासिक शस्त्रसंग्रहालय देखील पहाण्याची संधी मिळाली.
गोकुळ लोंढे यांनी किल्ल्याची माहिती दिली.
किल्ला फिरून झाल्यावर सर्वांसाठी भोजनाची देखील व्यवस्था केली
लोहगड दुर्गदर्शन सहलीला जाणाऱ्या बसची पुजा करताना महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष मंगल टेमगिरे यांच्या हस्ते करण्यात आली. लोहगड दुर्गदर्शन सहलीला जाणाऱ्या बसला उद्योजक बाबाजी गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.


सरपंच भूषण असवले यांनी सहलीसाठी शुभेच्छा दिल्या. सहलीला जाता जाता तुंग किल्ल्याचे दर्शन घडले. लोहगडावरून दिसणारा पवनेचा विस्तीर्ण जलाशय, पाहता आला. मुलांना ऐतिहासिक माहिती देण्यात आली. लोणावळा येथील शिवशाही ऐतिहासिक शस्त्रसंग्रहालयाला भेट घेतली.
सदानंद पिलाणे,रविंद्र असवले,योगेश गुणाट ,पवन क्षीरसागर ,चेतन लोंढे ,उल्हास असवले ,दिपक शिंदे,सागर खडके,सागर जांभुळकर यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!