पुणे:
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार राज्यभरातल्या तरुणांमध्ये लोकप्रिय नेते म्हणून गणले जाऊ लागले आहे .आमदार रोहित पवार यांची तरुणांमध्ये लोकप्रियता दिवसंदिवस वाढत आहे. राजकारणाला समाजकारणाची जोड असलेल्या आमदार रोहित पवार यांचं सामाजिक व राजकीय कारकीर्द तरुणांना आपलीशी वाटते .
आमदार रोहित दादा आपल्या कर्तुत्वाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. राज्यभरातील त्यांचे फॅन त्यांच्यावरील निष्ठा दाखवण्यासाठी वेगवेगळ्या कृतीयुक्त काम करत आहेत .कोणी गावापासून मुंबई पर्यंत आमदार रोहीत पवारांना पायी भेटण्यासाठी येते .
कोणी त्यांच्या गावापासून रोहित पवार यांना भेटायला पुणे शहर , जामखेड कर्जत या परिसरातील जाऊन भेटत आहेत. कोणी पेन्सिलच्या साहाय्याने त्यांचं रेखाचित्र काढून त्यांच्यावर निष्ठा व्यक्त करीत आहेत.
अशीच ऋद्धा उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील
पांडुरंग कोरे युवा कार्यकर्त्याने अधोरेखित केली.
या तरूणाने आमदार रोहित पवार यांचा टॅटू हातावर काढला.
त्याची आज कर्जतमध्ये आमदार रोहीत पवार यांच्याशी भेट झाली. कार्यकर्त्यांच्या या प्रेमाबाबत आदर करीत रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की,” कार्यकर्त्यांनी लोकहिताची अधिकाधिक कामं केली तर मला अधिक आनंद होईल.

error: Content is protected !!