टाकवे बुद्रुक:
तळेगाव जनरल हॉस्पिटल व सुकृपा नर्सिंग अ‍ॅण्ड मॅटर्निटी होम यांच्या संयुक्त विद्यमानाने टाकवे बुद्रुक येथील माऊली नगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हे शिबिर होणार असल्याची माहिती सुकृपा नर्सिंग होम चे डॉ.श्रेयस टोम्पे यांनी दिली. या शिबिरात मोतीबिंदू तपासणी,तिरळेपणा तपासणी ,लहान मुलांच्या डोळ्याच्या सर्व आजार याची तपासणी केली जाणार आहे.
गरज असल्यास सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे अधिक माहितीसाठी 98 22 84 32 42 व 82 37 28 26 28 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!