वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील भडवलीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमातील जेवणातून लहान मुले व नागरिकांना विषबाधा झाली .या बाधित नागरिकांना काले-पवनानगर व कान्हे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, या बाधीतांची आमदार सुनिल शेळके यांनी भेट घेऊन विचारपूस केली. काळजी करू नका,मी पाठीशी आहे असा विश्वास दिला.
रुग्णालयातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून आमदार सुनिल शेळके यांनी बाधीतांची विचारपूस केली.तसेच रुग्णांना आवश्यक सेवा-सुविधा देण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्या आहेत.
काही रुग्णांची प्रकृती स्थिर असून ज्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.इंद्रनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहेत.वेळीच उपचार मिळाल्याने अनेक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे.

error: Content is protected !!