


कामशेत:
पवनमावळ येथील ब्राम्हणवाडी बऊर येथे काकडा आरती सांगता सोहळा पार पडला. कार्तिक स्नान मध्ये गेली महिनाभर आनंदात चालू होता. त्यानिमित्ताने रात्री जागरा निमित्त रात्री नऊ ते अकरा ह.भ.प. अजिंक्य महाराज चाकणकर यांचे किर्तन झाले. रात्री अकरा ते पहाटे चार पर्यंत हरीजागर झाला. पहाटे साडेचार ते सात वाजेपर्यंत काकडा आरती झाली.
सकाळी अकरा ते बारा पर्यंत समाजभूषण ह.भ.प. मधुकर महाराज गराडे यांचे काल्याचे किर्तनाने काकडा आरतीची सांगता झाली.मोठ्या संख्येने महिला पुरुष भाविक भक्त उपस्थित होते. त्यांच प्रमाणे गेली तेरा वर्षे काकडा आरती तसेच समाजातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल गुणगौरव पुरस्कार श्री गणेश वाळुंजकर अध्यक्ष मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, खजिनदार अखिल वारकरी संघ मावळ तालुका यांना प्रदान करण्यात आला
त्यावेळी बऊर गावचे सरपंच श्री.संदीप खिरीड, पोलिस पाटील श्री श्रीकांत वाळुंजकर , माजी चेअरमन श्री विष्णूदादा वाळुंजकर ,चिखलसे गावचे सरपंच श्री सुनिलभाऊ काजळे, माजी सरपंच श्री मारुती वाळुंज,ग्रा.पं.सदस्य प्रविण भवार, श्री नितीन म्हस्के, श्री मुकुंद कंक, श्री सुभाष म्हस्के, श्री भरत कंक, श्री.सतिश वाळुंजकर, श्री संतोष वाळुंजकर, श्री प्रकाश वाळुंजकर, श्री कैलास दळवी, श्री मारुती म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
- बेलज येथे मदुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड’ आणि ‘क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाड्यांसाठी आवश्यक साहित्य वितरण
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर





