वडगाव मावळ:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वात मावळमधील अनेक सरपंच-उपसरपंच यांच्यासह भाजपमधील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मावळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नविन पक्ष प्रवेशाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले,
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी साथ लाभली आहे.मागील विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्याचे चित्र पालटले. सुनिल शेळके यांना लाभलेला जनाशीर्वाद हा इतका मोठा आहे की आता कोणीही तिथे आपला प्रभाव दाखवू शकत नाही. आजचा होणारा पक्षप्रवेश हा लोकांच्या या पाठबळाला अधिक ताकद दिल्याशिवाय राहणार नाही.


दरम्यान मावळात विविध विकास कामांमध्ये आमदार सुनिल शेळके यांनी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम केल्याने अनेक कार्यकर्ते मावळ राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.
मावळ भागात विकास कामे जोराने सुरू आहेत. सर्वांनी तरुण नेतृत्व स्वीकारले आहे. यात आपण सर्व गट-तट सोडून एकत्र आला आहात. मावळ तालुक्याला काहीही कमी पडणार नाही याची जबाबदारी पुण्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांनी घेतली आहे.तेव्हा मावळच्या विकासासाठी आपण आता एकसंघ होऊया, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. यापुढे सर्वांनी मिळून स्थानिक पातळीवर बूथ कमिट्या सक्षम करण्याचे काम करावे. यातूनच आता असलेल्या विधानसभेच्या ५४ जागांवरून आपण १०० जागांपर्यंत पोहचू, अशी सदिच्छा व्यक्त करत जयंत पाटील यांनी सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले.


यावेळी भाजपाचे युवा नेते देवा गायकवाड,माजी सरपंच वहाणगाव निवृत्ती वाडेकर,माजी सरपंच उर्से संतोष रसाळ, राशीदभाई सय्यद, महादू सुतार, धोंडीबा सावळे, उपसरपंच कांब्रे किरण गायकवाड, उपसरपंच गहुंजे नितीन बोडके, ग्रा.सदस्य स्वामी गायकवाड, गणेश तिकोणे, दत्ताभाऊ सावळे यांच्यासह अनेकांनी पक्षात प्रवेश केला.
शरदचंद्रजी पवार साहेब उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत.त्यांच्या विचारांनी व कार्याने प्रभावित होऊन अनेक युवक पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. त्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. अनेक पदाधिकारी व तरुण सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाने मावळ तालुक्यात पक्ष संघटना नक्कीच बळकट होईल व राष्ट्रवादीची ताकद देखील वाढणार आहे. त्यादृष्टीने सर्वांनीच पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम एकजूटीने करावयाचे आहे,असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.


या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार विद्याताई चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाषराव जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे,दिपालीताई हुलावळे, सुनिल भोंगाडे, कैलास गायकवाड , माजी कार्याध्यक्ष शिवाजीराव असवले इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!