मुंबई :
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मावळ तालुक्यातील १७_कोटी_७३_लाख रु.च्या पाटण प्रादेशिक पाणी योजनेस मंजुरी मिळाली.
गेल्या अनेक वर्षांपासून मावळ तालुक्यातील पाटण,बोरज, भाजे,सदापुर,दुधिवरे, शिंदगाव, देवले, औंढे, औंढोली येथील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्याची मागणी स्थानिक गावक-यांकडून होत होती. या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा करून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी नेहमीच आमदार सुनिल शेळके प्रयत्नशील आहे.
आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून या पाणी योजनेच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करुन काम पूर्ण होईल. व प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचुन माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरुन पाण्यासाठीची वणवण नक्कीच थांबेल.निवडणुकीपुर्वी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे आमदार शेळके यांनी अधोरेखित केले.

error: Content is protected !!