मुंबई :
डबेवाल्याचा मुलगा नगरसेवक होणार असेल तर डबेवाल्यांची संघटना त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभी राहील असा विश्वास मुंबई डबेवाला असोशिएन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिला.
मंगेश पांगारे सामाजिक,सहकार, कला-क्रिडा, क्षेत्रात काम करणारा एक सर्वसामान्य कर्यकर्ता. क्षितिज ग्रुपचा संस्थापक अघ्यक्ष मंगेश पांगारे यांनी क्षितिज ग्रुपच्या माघ्यमातुन दहीसर, बोरीवली तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत भरीव असे काम केले आहे.


बोरीवली, दहीसर विभागात क्षितिज ग्रुपच्या माध्यमातुन खुप मोठे संघटन त्याने उभे केले आहे. मुंबई महानगर पालिका वार्ड क्र ४ मध्ये समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनसाठी विविध उपक्रम राबवले वार्ड क्र ४ मधिल गरजवंताना यथाशक्ती सर्वोतोपरी मदत केली आहे व क्षितीज ग्रुपच्या माध्यमातुन मदतीचा हा ओघ कायम चालूच आहे.
हे सर्व करत असताना आम्हाला अभिमान आहे की मंगेश पांगारे हा एक डबेवाल्याचा मुलगा आहे. दादरचे डबेवाले मुकादम दत्तात्रय पांगारे यांचा तो मुलगा आहे.

आपल्या स्वकर्तुत्वाने जर एखादा डबेवाल्याचा मुलगा मुंबई महानगर पालिके ची निवडणुक लढवून नगरसेवक होणार असेल तर त्याचे मागे आम्ही खंबीर पणे उभे राहीले पाहीजे.
त्याला सर्वोतोपरी सहकार्य केलं पाहीजे
या मुंबई मध्ये माथाडी कामगार, गिरणी कामगार यांची मुले खासदार,आमदार, नगरसेवक झाली मग डबेलाला कामगाराचा मुलगा नगरसेवक का होऊ शकत नाही ? असा विश्वास तळेकर यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!