टाकवे बुद्रुक:
कान्हे फाटा टाकवे मुख्य रस्त्यावरील टाकवे येथील इंद्रायणी नदी पुलावरील संरक्षण कठडे गेले एक वर्षपूर्वी तुटलेले आहे, या सुरक्षा कठड्यावर ती मागील वर्षी पिंपळाचे झाडाची मोठी फांदी तुटून पडलेली होती ती फांदी अजूनही त्या ठिकाणी तशीच आहे, सुरक्षा कड्याचा तुटलेला भाग सुद्धा तसाच आहे.
आंदर मावळला शहरी भागाला जोडणारा हा मुख्य एकमेव रस्ता आहे, तसेच टाकवे येथे औद्योगिक वसाहत असल्यामुळे याठिकाणी शहरातील अनेक कामगार येत आहेत. तसेच आंदर मावळ मधील पन्नास गाव वाड्या वस्त्या मधील नागरिक याच धोकादायक पुलावरून तुटलेल्या काट्याच्या जवळून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.


याठिकाणी सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ ढिम्म प्रशासन यांचे लक्ष अजून या ठिकाणी नसल्याचे दिसून येत आहे, या रस्त्याने प्रवास करणाऱ्याची गाडी नदी मध्ये जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. अपघात झाल्यानंतर शासकीय विभागास जाग येणार का ? अस नागरिकांनी संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी सेवा फाउंडेशनचे संचालक ज्ञानेश्वर ढोरे, सामाजिक कार्यकर्ते गोरख गायकवाड, शिवाजी शिंदे, सुखदेव पिंगळे यांनी गाडी चालकाला अंदाज येण्यासाठी लाल कपड्याने या ठिकाणी पुलाचे तुटलेले कठाडे बांधले आहे.


सावित्री नदीपूल दुर्घटना झाली होती त्यावेळी महाराष्ट्र मध्ये सर्व पुलांचे सर्वक्षण करण्यात आले होते, त्यामध्ये सर्वप्रथम टाकवे येथील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक म्हणून शासकीय ऑडिटमध्ये सिद्ध झाले होते. तसेच दोन वर्षांपूर्वी इंद्रायणी नदी पुलावरून गाडी कोसळून झालेल्या अपघातात टाकवे गावातील दोन युवकांचा याठिकाणी दुर्दैवी पाण्यात पडून मृत्यू सुद्धा झालेला होता.
या सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन
यदाकदाचित ढिम्म प्रशासनास जाग तरी येईल
या लाल कपड्याच्या रंगाने असा ही तरूणाचा हेतु असेल.

error: Content is protected !!