मुंबई:: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे अंतर्गत उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी, त्याच प्रमाणे या महामार्गावरून प्रवास करत असताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कव्हच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे.
सिंधुदुर्गातील आजी-माजी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीच्या अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील पत्रकारांना टोल मुक्त प्रवास संधी उपलब्ध होणार आहे.आमदार, खासदार, मंत्री, स्वातंत्र्यसैनिक याचप्रमाणे पत्रकार देखील समाजासाठी झटत असतात, अशा आशयाची घोषणा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे.


तसेच टोल माफी मिळावी या मागणीसाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली विलीनीकरणाच्या एक वर्षानंतर राष्ट्र उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका निभवण्यासाठी पीएनबी झाले.
या भेटीवेळी प्रभू यांनी सिंधुदुर्गातील पत्रकारांची मागणी कशी रास्त आहे हे गडकरी यांना पटवून दिल्यानंतर केवळ सिंधुदुर्गातील पत्रकारांनाच नव्हे तर राज्यातील सर्व पत्रकारांना टोलमाफी करत असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली.असे काही वृत्तपत्रांमधून प्रसारित झाले होते .
त्याअनुषंगाने पत्रकार काही कामानिमित्त महामार्गावरून प्रवास करत असताना टोल नाक्यावरती पत्रकार असल्याचे आयडेंटी कार्ड दाखविले असता त्या ठिकाणीचे कर्मचारी व्यवस्थापन यांनी सांगितले अश्या पद्धतीच्या अजून तरी आम्हाला काही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत,

त्यामुळे आम्ही तुम्हाला टोलमधून सूट देऊ शकत नाही टोल भरावाच लागेल.
तसेच तुमच्याकडे काही जीआर असेल तर दाखवा जीआर असल्यास आम्ही तुम्हाला टोलमधून सूट देऊ तसेच मागील काही दिवसापूर्वी प्रसारित झालेल्या त्या बातमीमुळे आम्हाला विनाकारण मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे, आम्हाला या संदर्भात शासन स्तरावरून कसलाही जीआर प्राप्त झालेला नाही. जीआर प्राप्त झाल्यास आम्ही शासनाच्या नियमानुसार टोलमधून सूट देऊ. असे त्या ठिकाणच्या टोल नाक्यावरील कर्मचारी व सुपरवायझरने सांगितले.
असे पत्रकारांना अनुभव आल्यानंतर सद्यस्थिती तरी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केलेली घोषणा अफवा असल्याचे निदर्शनास येत आहे.

error: Content is protected !!