तळेगाव दाभाडे:
मिडटाऊन राऊंड टेबल ६५ पुणे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वराळे येथे नवीन ८ वर्गखोल्यांचे भूमीपूजन पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे , एरिया चेअरमन एरिया ५० किर्ती रुईय्या , एरिया चेअरपर्सन ३ निशरीन काचवाला , चेअरमन पी एम आर टी विकी बत्रा, व्हाईस चेअरमन विजय लोहिया यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
संस्थेमार्फत पहिल्या टप्प्यात चार नवीन वर्गखोल्या साठी 40 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असून दुसऱ्या टप्प्यात नवीन चार वर्गखोल्या बांधून देण्यात येणार आहेत असे विकी बत्रा व किर्ती रुईया यांनी सांगितले.


याप्रसंगी चैतन जैन , अनीष अगरवाल , दिपक अगरवाल, प्रतीक शहा , ममता तेजवानी, लवीना जैन , कनिका धर्मानी , हुजेर शेख , ग्रामपंचायत सदस्य जनार्दन पारगे, ग्रामपंचायत सदस्य महेश राजगुरु , ग्रामपंचायत निलेश मराठे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर भिकाजी मराठे व सर्व सदस्य उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने बाल दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ व बक्षीस देण्यात आले.


जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांच्यावतीने व शाळेच्या वतीने धन्यवाद मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत वराळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद शाळा वराळे शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा खोमणे, उज्वला साळुंके , अशोक बारवे , गंगाराम शेळके , सुवर्णा मोघे , संतोष भारती, नलिनी नांद्रे , सुरेखा पडवळ , मंगल जगदाळे , अरुणा रासकर व पुनम कानगुले या शिक्षकांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भारती यांनी केले तर आभार अशोक बारवे यांनी मानले.

error: Content is protected !!