पंढरपूर:.
राज्यात सुख शांती नांदावी आणि वारींची परंपरा कायम सुरु राहावी यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंढरीराया चरणी साकडे घातले. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे दोन वर्षानंतर वारकऱ्यांची वारी पंढरपुरात पोहचली आहे. विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पहाटे ३ वाजता पार पडली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पंढरपुरात कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.


राज्यात सुख शांती नांदावी आणि वारींची परंपरा कायम सुरु राहावी यासाठी अजित पवारांनी विठ्ठलाकडे साकडे घातले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेला उपस्थित होत्या. अजित पवार यांच्या हस्ते पहाटे २.१५ मिनिटांनी विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा केल्यावर ३ वाजता महापूजा करण्यात आली. विविध प्रकारच्या फुलांची आकर्षक सजावट कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात करण्यात आली होती. यामध्ये झेंडू, गुलाब, शेवंती अशा अनेक फुलांनी गर्भगृहाची सजावट करण्यात आली आहे. यंदा नांदेडचे कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले आहे. टोणगे दाम्पत्य हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निळा गावचे रहिवासी आहते. ते मागील ३० वर्षांपासून वारीला येतात.

error: Content is protected !!