कामशेत :
देशातील तरुण निर्व्यसनी असेल तर देश लवकर विकसित होईल यासाठी निर्व्यसनी समाज घडवला पाहिजे अशी ज्यांची धारणा आहे असे कामशेत येथील महावीर हॉस्पिटल चे डॉ.विकेश मुथा हे गेल्या पाच वर्षापासून मावळ तालुक्यात व्यसनमुक्त चळवळ राबवत आहे.
डॉ.विकेश मुथा यांची तरुणांच्या व्यसनमुक्ती साठी धडपडणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची पंचक्रोशीत ओळख बनली आहे प्रत्येक गावात जाऊन तरुणांनी व्यसन सोडले पाहिजे यासाठी वेगवेगळे उपक्रम आणि शिबीर डाॅ.राबवत आहेत. मागील पाच वर्षात सुमारे पाच हजार तरुणांनी व्यसन सोडले आहे. व्यसन दारूचा असो, तंबाखू ,विडी सिगरेटचा असो हे व्यसन आरोग्यास घातक आहे हे वेळोवेळी डॉ.विकेश मुथा तरुणांना समजाऊन सांगत आहे .
तरुण पिढीच काय शेतकरी ज्येष्ठ महिला या देखील तंबाखूची मिश्री लावून कॅन्सर ग्रस्त झाल्याची अनेक उदाहरणं मावळ तालुक्यात आपण पाहतो ,या सर्वांवर सामाजिक प्रबोधन करण्याचे काम डॉक्टर करीत आहे. सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या हा तरुण वैद्यकीय क्षेत्रातील मर्यादा ओलांडून समाजाभिमुख काम करणारा तरुण अशी त्यांची ओळख बनली आहे .


समाजातील दीनदुबळ्यांना कायमच मदतीचा हात पुढे करणारे डॉक्टर शैक्षणिक क्षेत्रात देखील सदैव पुढे आहे. विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणं हा त्यांचा पिंड आहे. खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते सातत्याने मदतीचा हात पुढे करीत आहे .त्यांनी केलेल्या मदतीवरच अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर ती मजल मारू शकले आहेत. वेगवेगळ्या संकटात देखील मुथा यांचा मदतीचा हात सदैव पुढे असतो. मग निसर्ग चक्रीवादळ असो ,आपत्ती असो ,कोरोनाग्रस्त परिस्थिती असो अथवा आकस्मित आलेलं संकट असो, यावर मदतीचा हात डॉ.मुथा यांनी केला नाही असा दिवस सध्यातरी उगवला असं वाटत नाही .
व्यसन मुक्ती हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत आवडीचा असा हा विषय संत परंपरेचा वारसा लाभलेल्या मावळ वासियांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरी निरूपण सोहळा करून घरोघरी ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचे काम यांनी केलेलं आपल्याला पाहिलं असेल .
गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली की व्यसनापासून परावृत्त करता येतं हा अलिखित नियम ओळखून अनेक सर्वांना त्यांनी तुळशीच्या माळा गळ्यात घालण्यास प्रवृत्त केले आहे ज्यामुळे अनेक तरुणांनी व्यसन सोडले आहेत याशिवाय ते प्रबोधन करीत आहेत.
माहितीसाठी अधिक : ९८२२४०३४२२

error: Content is protected !!