सोमाटणे:
मावळ मल्लसम्राट प्रतिष्ठान व आमदार सुनीलआण्णा शेळके युवा मंच यांचे वतीने आयोजित पवन मावळ विभाग मर्यादित “भव्य किल्ले बनवा “स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पवनानगर ता.मावळ या ठिकाणी संपन्न झाला. वय वर्षे 5 ते 13 या वयोगटातील मुला-मुलींसाठी ही किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मावळ मल्लसम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पै.नवनाथ बोडके,शिवणे गावचे सरपंच अजित चौधरी, उद्योजक प्रकाश वरघडे यांचे हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि शिवप्रतिमा देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी दशेतील मुलांमध्ये छत्रपती शिवरायांचा उज्वल इतिहास जागृत करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असल्याचे मत अध्यक्ष नवनाथ बोडके यांनी व्यक्त केले.

यावेळी इयत्ता पाचवीमध्ये शिकणारा चि.हर्ष शिवणेकर याने कवी भूषण यांचे धर्मवीर संभाजी महाराजांवरील काव्य सादर केले आणि छत्रपती शिवरायांची घोषणा देऊन वातावरणात चैतन्य निर्माण केले.
यावेळी भडवली गावचे ग्रामपंचायत सदस्य संभाजी लोहर, शिवणे ग्रामपंचायतीच्या सदस्या मीनाक्षी शिवणेकर, उद्योजक दिलीप आडकर, मावळ शिक्षक पतसंस्थेचे मा.चेअरमन ज्ञानेश्वर शिवणेकर इ.उपस्थित होते.


स्पर्धेचे संयोजन आणि परीक्षण रवी उंबरकर, संतोष मोहोळ, अंकुश काळे यांनी केले तर सुत्रसंचालन संजय काळे यांनी केले.
●●स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
*प्रथम क्रमांक*- हर्ष ज्ञानेश्वर शिवणेकर
*द्वितीय क्रमांक*- मिताशी मोहन काळे आणि ओमकार सुनील वरघडे
*तृतीय क्रमांक*- सिद्धेश दिलीप आडकर.

error: Content is protected !!