तळेगाव दाभाडे::    
           मी सुद्धा एसटी कंडक्टरचा मुलगा असल्याने एसटी कामगारांच्या व्यथा मला माहित आहेत.तुटपुंजा पगार,अपुऱ्या सोयी सुविधा यामुळे आर्थिक विवंचनेमुळे एसटी कर्मचारी दबला गेला आहे.महाराष्ट्र सरकारने आंदोलन दाबण्यापेक्षा यांच्या समस्या सोडवाव्यात.असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज तळेगाव दाभाडे एसटी कर्मचारी आंदोलनाला भेट दिली.

त्यावेळी ते बोलत होते.यावेळी शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,माजी नगराध्यक्ष अँड रविंद्रनाथ दाभाडे,संजय वाडेकर, सचिन आरते, हिम्मत पुरोहित, संजय जाधव, विनायक भेगडे, नितीन पोटे, शिवांकुर खेर, अनिल वेदपाठक,उपेंद्र खोल्लम, अनिल शेलार, पंढरीनाथ दाभाडे,एसटी कामगार संघटना पदाधिकारी दिपक दगडकर,पांडुरंग बांदल,शरद पवार,प्रमोद नखाते,अमोल रणदिवे,गणेश मुंडे,कैलास बागुल,दिवाकर रोजतकर,धनंजय मुंडे,प्रकाश भोकरे,कदम,बबन कोटकुले आदी कामगार व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


प्रविण दरेकर म्हणाले,”एसटी चे विलिनीकरण करावे आणि एसटी कर्मचाऱ्यांची ससेहोलपट थांबवावी. असे सरकारला आवाहन केले. यावेळी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाकडून दरेकर यांचे सागत करण्यात आले.

error: Content is protected !!