मुंबई:
अनंत जन्मीचे विसरलो दु:ख | पाहता तुझे मुख पांडुरंगा!! अशा भक्तीचा अवीट कार्तिक स्नान काकड आरती सोहळा ओम साई वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ व ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्थेत मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.
गेले २५ वर्षे ओमसाई वारकरी सांप्रदायिक भजन मंडळात रवि मुंढे‌ (संस्थापक-अध्यक्ष)यांच्या हस्ते काकडा ‌आरती केली जात झाली.मुंबई सारख्या ठिकाणी एवढ्या धावपळीच्या शहरात काकड आरती साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे.


वारकरी पारंपारिक चाली घेऊन भजन‌ सुरू असून रवी मुंढे व रेश्मा मुंढे (ओम साई महीला मंडळ अध्यक्षा) व सोसायटीतील सर्व पदाधिकारी सभासद सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य होत आहे. पहाटे ४.३० वाजता टाळ , विणा , पखवाज पुजन करुन कार्यक्रमात सुरूवात होती.
ओम साई वारकरी सांप्रदायिक भजन मंडाळातील सर्व सभासद व ओमसाई आरती महिला मंडळाचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत. नित्य नेमाने पुजा पाठ ह.भ. प.सुरेश महाराज बोंबले व त्यांचे सहकारी , दिलीप राजगुरु नेहमीच कार्यरत आहेत.वार बुधवार दि:१७/११/२०२१ रोजी ह.भ.प.विशाल‌ महाराज खोले(मुक्ताईनगर , जळगाव),वार गुरूवार दि:१८/११/२०२१रोजी ह.भ.प.अशोक महाराज पांचाळ (आळंदी देवाची),वार शुक्रवार दि:१९/११/२०२१रोजी ह.भ.प.सागर‌ महाराज शिर्के (शिरगाव आळंदी),वार शनिवार दि:२०/११/२०२१रोजी ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्री(परभणी), यांचे किर्तन होणार आहे.
वार रविवार दि:२१/११/२०२१ रोजी काल्याचे किर्तन ह.भ.प.आसाराम महाराज बडे(आळंदी देवाची) यांचे कीर्तन होणार आहे.


गोरक्षनाथ भजन मंडळ गोराई,नवखंडेनाथ भजन मंडळ कांदरपाडा दहीसर,विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ एकतानगर म्हाडा, नटेश्वर भजन मंडळ सातबंगला,मुंबई जेवन डब्बे वाहातुक मंडळ व माऊली गृप कांदीवली,स्वरानंदी भजन मंडळ सातबंगला या मंडळाची काकड आरती साठी अतिशय छान साथ लाभते.|| इवलेसे रोप लावियेले द्वारी | त्याचा वेलू गेला गगनावरी
ओमसाई वारकरी सांप्रदायिक भजन मंडळातील सर्व सभासद एकोप्याने असल्या कारणाने आज आपल्याला या मंडळाचा वटवृक्ष पाहायला मिळतो. या मंडळाने खुप मेहनत घेऊन अनेक सांप्रदायिक कार्यक्रम हाती घेऊन यशस्वीपणे संपन्न केले आहेत.
ओमसाई वारकरी सांप्रदायक भजन मंडळ व ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्था न्यु लिंक रोड मेट्रो स्टेशन डाहाणुकरवाडी कांदिवली प.मुंबई येथे हा सोहळा सुरू आहे.

error: Content is protected !!