कामशेत:
मावळ तालुक्यातील वाडीवळे येथील रेल्वे पूलाचे काम तातडीने पूर्ण करा या मागणीसाठी मावळ तालुका शिवसेनेचे उपप्रमुख डॉ. विकेश मुथा यांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन रेंगाळलेले काम तातडीने मार्गी लावावे यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली .यावेळी कामशेत शहर शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष गणेश भोकरे उपस्थित होते.
मागील काही महिन्यांपासून हे काम रेंगाळेल आहे .या रेंगाळायला कामामुळे नागरिकांची गैरसोय होते .नाणे मावळ्याच्या पश्चिम भागातून येणाऱ्या नागरिकांना वळसा घालून शहरात यावे लागते. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खोदाई केल्याने हा रस्ता मागील वर्षभरापासून वाहतुकीस बंद आहे .परिणामी कामशेत बाजारपेठेतील पश्चिम भागात होणारी नागरिकांची गर्दी टाळल्याने व्यापारीवर्ग से नुकसान होत आहे
तसेच वाडिवळे,वळक, बुधवडी,सांगिसे,खांडशी,नेसावे या भागातील नागरिकांना खामशेत खिंडीतून वळसा घालून जावे लागते.


कामशेत ची ही खिंड धोकादायक असून येथे या पूर्वी अनेक अपघात होऊन कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. तर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर केलेल्या खोदाई च्या रस्त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थी पायपीट करीत कामशेत शहरातील शाळा महाविद्यालयात येत आहे मागील महिन्यात मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या सह शासकीय अधिकारी व नाणे मावळातील कृती समितीने या ठिकाणची पाहणी केली होती.
अद्याप या कामाची सुरूवात झाली नसून रेंगाळले काम तातडीने सुरू करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी डाॅ.विकेश मुथा यांनी केली आहे.

error: Content is protected !!