वडगाव मावळ:
विख्यात सर्पतज्ञ व जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य असलेल्या डाॅ सदानंद राऊत यांचे प्रथमच मावळ तालुक्यात जाहीर व्याख्यान व स्लाईडशो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या सोमवारी ( ता.१५) सकाळी अकरा वाजता आंदर मावळातील कुसवली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. ‘सर्पदंश काळजी, प्रथमोपचार व इलाज’ हा त्यांच्या व्याखानाचा मुख्य विषय आहे. माहितीपट व स्लाईड शोच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करणार आहेत.
ग्रुप ग्रामपंचायत कुसवली व येथील सहारा वृध्दाश्रमाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


मावळ तालुक्यात सर्पदंश व त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असून सापाबद्दल अनेक समज व गैरसमज आहेत. मुळचे सातारा येथील असलेले डाॅ राऊत हे गेली ३० वर्ष सर्पदंशावर उपचार व जनजागृतीचे काम करीत असून त्यांच्या कार्याची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे.
त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले असून त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास केला जातो . महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने देखील त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा विविध पुरस्काराने गौरव केलेला आहे.
तालुक्यातील सर्व सरपंच , शिक्षक,अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांचा या कार्यक्रमासाठी विशेष सहभाग असणार आहे.अशी माहिती कुसवलीच्या सरपंच चंद्रभागा दाते व सहारा वृध्दाश्रमाचे विजय जगताप यांनी दिली.

error: Content is protected !!