वडगाव मावळ:
पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष भेगडे व कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली दीपक हुलावळे,गहुंजेओए सरपंच कुलदीप बोडके विजयी झाले. पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी दोन दिवसापूर्वी निवडणूक घेण्यात आली होती. निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला .
मावळ तालुक्यातून तीन विजय झाल्याने कही खुशी कही गम असंच चित्र आहे .या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली होती. या लढतीत मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर कोणताच नगरसेवक निवडून येता देखील राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष भेगडे विजयी झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या दिपाली हुलावळे या ही विजयी झाल्याने ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकत अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

भाजपचे कुलदीप बोडके हे विजयी झाल्याने भाजपच्या गोटात भाजपची तालुक्यात ताकत असल्याचा दावा करण्यात करण्यात आला आहे. दोन चार दिवसापूर्वी दिवसापूर्वी आमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचा निष्ठेवर बोट ठेवीत निशाणा साधला होता.
तर भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या निष्ठेचा प्रश्न करीत पलटवार केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन व भाजपाचा एक असे तीन सदस्य मावळ तालुक्यातून पुणे महानगर नियोजन समिती काम पाहणार आहेत.

error: Content is protected !!