वडगाव मावळ:
मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात भात कापणी झोडपणी काम अंतिम टप्प्यात आली, असून बळीराजाला सुगीचे दिवस आले आहेत.आपल्या भाताची झोडपणी करून तयार झालेले भात घरी घेऊन जाण्यासाठी बळीराजाची मोठी लगबग सुरू आहे.
भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात पारंपारिक भात वाचा बरोबरच संकरित भाताच्या वाहनाला मोठी पसंती आहे. मावळचा इंद्रायणी वाण राज्यभर सर्वदूर प्रसिद्ध आहे इंद्रायणीच्या वाणाची चव उत्तम असून शेतकरी बांधव इंद्रायणीच्या या वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड करीत आहे .


अंदर मावळ ,नाणे मावळ ,पवन मावळ या सर्व भागात भात कापणी आणि झोडपणी ही कामे अंतिम टप्प्यात आली ,असून काम पूर्ण करण्यासाठी बळीराजाची मोठी लगबग सुरू आहे शेतीला शेतीच्या कामाला मजूर तुटवडा जाणवत असल्याने जास्त वेळ काम करून बळीराजा शेतीची काम तत्परतेने पूर्ण करीत आहे. शेतीच्या कामाला शेतकरी कुटुंबातील बायका-मुलांसह शेतकरी राजा उन्हातान्हात दिवसभर राबराब राबत आहे.
भात लावणी पासून बेणणी,खुरपणी, कापणी ,भाताची झोडपणी आणि भात घरी घेऊन जाणं ही सगळी कष्टाची कामे.
या कामासाठी जितके कष्ट होतात इतक्या मोबदल्यात बळीराजाच्या पदरात आर्थिक उत्पन्न होत नसल्याची खंत शेतकरी राजा वारंवार बोलून दाखवित आहे. ग्रामीण भागात पावसाच्या पाण्यावर भात शेती अवलंबून असल्याने आणि या शेतीला दुसरा पर्याय नसल्याने बळीराजा ही काम नाईलाजाने का होईना पूर्ण करीत आहे. मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातून तयार झालेला भात कामशेत ,वडगाव, पवनानगर ,टाकवे बुद्रुक या बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून खरेदी केला जातो. मोठ्यामोठ्या राईस मिल मध्ये या भाताची भरडणी करून करून थेट ग्राहकांच्या विक्रीसाठी उपलब्ध केला जातो .


शेतकरी आणि थेट ग्राहक अशी कोणतीच यंत्रणा नसल्याने मध्यस्थी करणारे व्यापारी भाताच्या व्यापारातून लाखो रुपयांचा नफा कमवीत असल्याचे चित्र मावळ तालुक्यात आहे .यात व्यापारी वर्ग आर्थिक दृष्ट्या संपन्न होत असला ही समाधानाची बाब आहे .मात्र ज्या तुलनेत शेतकरी बांधवांना भाताच्या कमाईतून आर्थिक उन्नती साधता यावी तितकी कमाई या पिकातून होत नसल्याच्या तक्रारी बळीराजा नेहमी करीत असतो. मात्र यावर अध्याप कोणताच पर्याय उपलब्ध झाला नाही.
शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना रुसली गेली आणि त्यास बळकटी मिळाली तर नक्कीच या शेतीत किफायतशीर ठरू शकेल असा विश्वास शेतकरी मंडळी वारंवार करीत आहे.

error: Content is protected !!