तळेगाव दाभाडे : पुणे महानगर नियोजन समितीचे आमचे तिन्ही उमेदवार निवडून यावेत अशी भाजपची स्ट्रॅटेजी आहे. महा विकास आघाडी मध्ये कुरघोडी आहे.त्यांना पराभव सामोर दिसत असल्याने मावळचे आमदार सुनिल शेळके खोटेनाटे आरोप करीत असल्याचा आक्षेप पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी पत्रकार परिषदेत घेतला.
आमदार सुनिल शेळके यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या निष्ठेवर बोट ठेवीत त्यांना निवडणुकीत टार्गेट केलं होतं याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सुनिल शेळके यांच्यावर पलटवार केला आहे.
नगर परिषद गटातून निवडणूक लढवीत असलेले तळेगाव चे नगरसेवक संतोष मारुती भेगडे हे पीएमआरडीए च्या निवडणुकीत विजय झाले तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदारकीचे उमेदवार ठरू शकतात .त्यामुळे त्यांचा पत्ता वेळेत कट करण्यासाठी आमदार शेळके यांनीच भाजपाचे नगरसेवक काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचे सूतोवाच केले आहे की काय अशी शंका गणेश भेगडे यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.


आमदार शेळके यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांची निष्ठा अधोरेखित केली आहे. भाजपचे कार्यकर्ते निष्ठा वगळून मतदान करणार नाहीत असं सांगितल्यावर जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी आमदार शेळके यांच्या निष्ठेवरवर बोट ठेवले. तीन वेळा आमदार झालेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेकांच्या उमेदवार या पक्षाने कापल्या तरीही त्यांनी पक्ष सोडला नाही. मात्र विधानसभेची उमेदवारी मिळत नाही असं लक्षात येताच एका रात्रीत आमदार शेळके यांनी भाजपला राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला.त्यांनी भाजीपाला निष्ठा शिकू नये पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये किंवा अन्य निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाची स्टेटस ही ठरलेली असते. नेतेमंडळी आप- आपल्या परीने प्रयत्न करत असतात, गाठी भेटी होत असतात अशा गाठी भेटीतून राजकीय शक्यता काढणं हे सोयीचे ठरत नाही.
निवडणुकीच्या आदल्या दिवशी अशाप्रकारची पत्रकार परिषद घेऊन आमदार शेळके काय साध्य करणार असा खोचक प्रश्न भेगडे यांनी व्यक्त केला .पी एम आर डी च्या निवडणुकीपूर्वी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांची भेट घेऊन भाजपच्या नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान करा असं साकडं घातल्याचा सांगत शेळके यांनी बाळा भेगडे यांच्या निष्ठेवर बोट ठेवले.याला प्रतिउत्तर देताना गणेश भेगडे यांनी मावळ तालुक्यातील लोणावळा व तळेगाव दाभाडे नगर परिषदेत कोणाची सत्ता आहे. अशी विचारणा करत, लोणावळा नगरपरिषद भारतीय जनता पार्टी चे नगराध्यक्ष असून काँग्रेसचे सहा नगरसेवक सत्तेमध्ये आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले आमदार सुनिल शेळके यांचे आरोप यात काही तथ्य नाही असे त्यांनी सुचवलं या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू असल्याचे सांगून भाजप चे नगरसेवक मतदानासाठी एक रुपया देणार नाही असे स्पष्ट केले.ही निवडणूक गुप्त पद्धतीने होणार असल्याने पक्षाचा व्हीप बजावता येणार नाही असेही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

error: Content is protected !!