नवलाखउंब्रे:
व्यवसायात जिद्द,चिकाटी आणि सातत्य ठेवल्यास यश मिळते असा कानमंत्र पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक, यशस्वी उद्योजक गणेश खांडगे यांनी दिला.
नवलाखउंब्रे येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मावळ तालुका राष्ट्रवादी सेवादलाचे अध्यक्ष जालिंदर शेटे यांच्या आदिती मिल्क पार्लर व टी हाऊसचे उद्घाटन नगरसेवक खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खांडगे बोलत होते. प्रदेश राष्ट्रवादीचे चिटणीस विक्रम कदम, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शिवाजी असवले,माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष नरवडे, उद्योजक देविदास पडवळ,माजी उपसरपंच रविंद्र कडलक, उद्योजक साईनाथ गवारी राहूल शेटे, नवनाथ पडवळ, गोरख शेटे, शांताराम शेटे, लहू कदम ,माजी पंचायत समिती सदस्या ललिता कोतुळकर,उषा शेठे, संतोष शेटे, दादाभाऊ शेटे ,अनिल काकडे, महेश शिर्के उपस्थित होते.


राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे तालुका अध्यक्ष असलेल्या जालिंदर शेटे यांच्या धडपड्या स्वभावामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ते हा व्यवसाय अधिक समृद्ध करतील असा आशावाद व्यक्त करीत नगरसेवक गणेश खांडगे यांनी जालिंदर शेटे यांना शुभेच्छा दिला. समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन आपले सामाजिक काम उत्तमोत्तम असले तरी कार्यकर्त्यांनी प्रपंच नेटका करावा असे सुतोवाच करीत खांडगे यांनी तरूणांनी व्यवसाय व नोकरीत प्रमाणिक पणा व विश्वासार्हतेची जपणूक करावी असा सल्ला दिला.

error: Content is protected !!