तळेगाव दाभाडे :
पीएमआरडीए च्या सदस्य निवडीच्या निवडणुकांना सामोरे जात असताना भाजपचे नेते काँगेसच्या नेत्यांशी बैठका करत आहेत. यामुळे या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकाना काँगेसच्या उमेदवारास मदत करण्याच्या सूचना आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आणि जर भाजप या निवडणुकीत काँगेसला मदत कारणार असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र एकेकाळी मावळ व देश कॉंगेस मुक्त करू अश्या घोषणा देणाऱ्यां भाजपच्या माजी मंत्र्यांना काँगेसच्या नेत्यांशी बैठका करण्याची वेळ का आली? असा टोला देखील यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी माजी राज्यमंत्री भेगडे लगावला.
उद्या (बुधवारी,दि.१०) पीएमआरडीए च्या सदस्य निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार सुनिल शेळके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे आमदार शेळके म्हणाले, कि या निवडणुकीत समोर पराभव दिसत असल्याने भाजपकडून काँगेसला पाठींबा देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपने कॉंगेस सोबत युती केली तर या निवडणुकीत एकतर्फी आमचाच विजय होईल. मात्र भाजपाच्या नेत्यांनी जरी निष्ठा सोडली तरी भाजपचे नगरसेवक निष्ठा सोडणार नाहीत याची मला खात्री आहे. एकवेळ भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या उमेदवारास पाठींबा देतील पण कॉंगेसकडे जाणार नाहीत.
या निवडणुकीत निष्ठा बाजुला ठेऊन आपल्या स्वार्थासाठी कोण काम करतोय हे समोर येईल. यामुळे नेत्यांनी निष्ठा केवळ भाषणात न दाखवता निवडणुकीत देखील दाखवावी अशी टीका देखील आमदार शेळके यांनी यावेळी केली.
तसेच पीएमआरडीए च्या या निवडणुकीत भाजप काँगेसला छुपा पाठींबा देणार कि नाही हे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.
या निवडणुकीत मावळसाठी नगरपरिषदेची एक जागा व ग्रामपंचायतीची एक जागा अश्या दोन जागा मिळाल्या असून या दोन्ही जागांसाठी दिलेले दोन्ही उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या निवडणुकीत लोणावळा (26) तळेगाव दाभाडे (27) आळंदी (19) शिरूर (22) सासवड (20) या नगरपरिषदेतील एकूण 114 मतदारांचा समावेश आहे.
या गटात वेगवेगळ्या स्थानिक आघाडीने सर्वाधिक मतदान आहेत. त्या खालोखाल भाजपच्या चिन्हावर 36 नगरसेवक निवडून आले आहेत. आणि या मतदारात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे नगरसेवकांचा समावेश आहे .
वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. शिरूर आणि लोणावळा नगरपरिषद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत, त्यामुळे या मतदारांचा कल कोणाकडे राहील यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. पक्षनिष्ठा आणि अर्थकारण यात कोण बाजी मारत हे येणारा काळच ठरवेल या मतदारसंघातून पीएमआरडीए साठी निवडून येणारा सदस्य जोपर्यंत त्याचा नगरपरिषदेतील कार्यकाळ शिल्लक आहे, तोपर्यंत तो सदस्य म्हणून राहणार आहे. तळेगाव नगरपरिषदेचा कालावधी 14 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे, तर सासवड नगरपरिषदेचा कालावधी फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे. यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवारास कमी कालावधी मिळणार आहे .मात्र तरी देखील निवडून येण्यासाठी उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

error: Content is protected !!