करंजगाव:
मावळ तालुक्यातील करंजगावच्या कातकरी पाड्यावर दिघीतील सोमनाथ माने यांच्या कॅरेमेलाज केक शाॅपी कडून भाऊबीज साजरी करण्यात आली. पाड्यावरील भाऊबीजेने दिघीकर भारावून गेले. तर ऐन सणासुदीला पाड्यावर येऊन मोठ्या अस्थेने आणि आपुलकीने साजरी झालेल्या भाऊबीजेचे आदिवासी बांधवाना अप्रूप वाटले.
भाऊबीज निमित्ताने कातकरी पाड्यावरील महिलांना साड्या वाटप करण्यात आले. महिलांनीही मोठ्या आनंदाने औक्षण केले.संजीव येळगे यांच्या कडून लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमास दिपाली माणिक साबळे,सरपंच करंजगाव ,सोमनाथ माने, अनुज माने,आकाश साठे संजीव येळगे, उपसरपंच नवनाथ ठाकर, ग्रा. सदस्य महादू शेडगे ,तंटामुक्त अध्यक्ष भाऊसाहेब मोरमारे,माजी तंटामुक्त अध्यक्ष इंदाराम उंडे,ग्रा. सदस्य कौसल्या शिवाजी पवार,पोलीस पाटील राजश्री तंबोरे,सहादू पोटफोडे, तुकाराम कशाळे,शंकर हिले,सुरेश वाघमारे,अंकुश भालशिंगे उपस्थित होते.
करंजगावचे उपसरपंच नवनाथ ठाकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष इंदाराम उंडे म्हणाले,” आपल्या घरी आनंदाने दिवाळी साजरी होत असताना शेजारीच्या घरात दिव्याला तेल नाही,असे असताना आपण दिवाळी साजरी करता आणि आनंदी राहू शकत नाही.हे वचन हे ज्यांनी जाणले अशीच ध्येयवेडी माणसं तळागाळापर्यंत जाऊन असे स्तुत्य उपक्रम राबावित आहेत.
उपसरपंच नवनाथ ठाकर म्हणाले,” गावपातळीवरील आमच्या आदिवासी पाड्यात पहिल्यांदा अशा प्रकारे सार्वजनिक भाऊबीज साजरी झाली याचे आम्हाला मोठे समाधान आणि आनंद आहे. भविष्यात अशा प्रकारे उपक्रमास आमचे सहकार्य आणि पाठिंबा असेल.
भाऊसाहेब मोरमारे यांनी प्रास्ताविक केले. योगेश माझिरे यांनी सुत्रसंचालन केले. राजश्री तंबोरे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!