महाराष्ट्राच्या राजकारणातील सुवर्णाक्षराने कोरून ठेवावे असे नाव म्हणजे स्व.आर.आर.पाटील तथा आबा. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत राजकारणातील उजवे ठरलेल्या आबांच्या जीवनपैलूचे अनेक कोने उलगडून सारा महाराष्ट्र पाहतोय.त्यांच्या जाण्याने संपूर्ण पाटील परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र आजही हळहळतोय.
आबांची कन्या स्मिता यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पप्पांचा शेवटचा दिवस! या भावनिक पोस्ट्ने डोळ्याच्या कडा पाणावल्या..अन आबांच्या आठवणीने सारा महाराष्ट्र हुंदके देऊ लागला.
स्मिता भावनिक पोस्ट मध्ये लिहितात.
‘आज ८ नोव्हेंबर … बरोबर ७ वर्ष झाली . माझ्या वडीलाना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन .. ! आजच्या दिवशी २०१४ मध्ये सकाळी ११ वाजता माझ्या वडीलांनी घर सोडले.
काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय असं पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते.
३ नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते . या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते.
६ नोव्हेंबरला पप्पा अंजनीला घरी आले. हेलिकॉप्टर मधून सगळं गाव दोन – दोनदा फिरून बघितले.घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत, त्याच प्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांन कडे बघुन जात असत.पण त्या दिवशी मात्र पप्पा जाताना लोकांच्या मधून वेळ काढून मी व माझी बहिण सुप्रिया आम्ही वरती आमच्या रूम मध्ये होतो. तर पप्पा त्या दिवशी वरती येऊन आम्हा दोघा बहिणी ना घट्ट मिठी मारली व त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी उभारले होते.
आम्ही दोघी बहिणी ही विचार करू लागलो की पप्पांना काय वाटले असावे की पप्पांनी मिठ्ठी मारली व पप्पांच्या डोळ्यात का पाणी उभारले असावे ? पण आम्हाला वाटले नव्हते की,आज पप्पांनी आम्हाला शेवटचे कुशीत घेतले असावे व त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारूती – शंकराचेही न चुकता दर्शन घेतलं होते.
स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की,स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवट चा सत्कार ठरावा ! आता आणख किती सत्कार करणार .. ?
मृत्यु पप्पा ना अधीच दिसला होता का ?

error: Content is protected !!