टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतींचे उपसरपंच ऋषीनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला. उपसरपंच ऋषीनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळात दिलेल्या शब्दाला मान देत मुदतीत सरपंच भूषण असवले यांच्या कडे ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.
यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. ऋषीनाथ शिंदे आंदर मावळ भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष होते

.उपसरपंच निवडणुकी पूर्वी त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घडयाळ हातावर बांधले होते. त्यांना उपसरपंच पदाचा बहुमान मिळाला. गाव पातळीवरील शिष्टमंडळाने एकमुखाने शिंदे यांच्या नावाची शिफारस करून त्यांना उपसरपंच पदावर संधी दिली होती. काही महिन्यांसाठी शिंदे यांना संधी मिळाली यात त्यांनी भरीव काम केलेल्याचा दाखला मतदार देत आहे.


ऋषीनाथ शिंदे यांच्या नंतर कोणाला संधी मिळणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या पुढील उपसरपंच निवडीच्या प्रक्रियेत शिष्टमंडळाचा सहभाग मोलाचा ठरणार आहे.

error: Content is protected !!