वडगाव मावळ:
आश्विन महिन्याच्या कोजागिरी पौर्णिमा झाल्यानतंर मावळातील अनेक गावातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सुरु होणाऱ्या काकड आरतीची सुरवात पारंपारिक पद्धतीने झाली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली काकड आरतीच्या परंपरेला पुन्हा एकदा सुरवात झाली.
पहाटेच्या गुलाबी थंडीत मावळातील अनेक गावात कर्णामधून ऐकू येत असलेले काकड आरतीचे स्वर, अभंग, गवळणी यामुळे मावळची पहाट भक्तिमय होत आहे.मावळात पारंपरिक पद्धतीने गावातील सण साजरे केले जातात त्यामध्ये काकड आरतीचे महत्व वेगळे आहे. विठ्ठल- रुक्मिणीची मंदिरे असलेली मावळातील गावे आजही काकड आरती पारंपरिक पद्धतीने साजरी करत आहे.


कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे. सकाळी पहाटे पाच ला कार्यक्रम चालू होतो.
यावेळी देवाला दह्या- दुधाने स्नान घातले जाते. त्यांनतर काकडा आरती, भूपाळी अभंग, पूजेची ओळ, वासुदेव, पांगुळ, मुका, बहिरा ह्या गवळणी, शेवटला विठ्ठलाची, ज्ञानदेवांची, तुकारामांची आरती होते.


पहाटे चार वाजता सुरू झालेल्या काकड आरतीचे मानकरी यांसकडून शेवटला प्रसादाचे आयोजन केले जाते. सकाळी सात वाजता कार्यक्रम संपतो. Lत्रिपुरारी पौर्णिमाच्या दिवशी काकडा समाप्ती होते. अशी माहिती टाकवे येथील भाविक देवराम असवले यांनी दिली.
दररोजची काकड आरती गावाच्या नियमाप्रमाणे एका घराण्याला दिली जाते त्यानुसार काकड आरती केली जाते. काकड आरतीची सांगता कार्तिकी पौर्णिमेला केली जाते. त्यावेळी काल्याचा कार्यक्रम करून संपूर्ण गावला महाप्रसाद दिला जातो. भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
मागील दोन वर्षांपासून मंदिरे बंद असल्याने यावर्षी भाविक मोठ्या प्रमाणात मंदीरात येत आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्यांना आकर्षक सजावट केली जात आहे. मंदिरापुढे रांगोळ्या काढल्या जात आहे. काकड आरतीमुळे भाविक एकत्र येऊन कार्यक्रमाचा आनंद लुटत आहेत. तसेच गावाचं गावपण टिकून राहण्यासही मदत होत आहे.

error: Content is protected !!