टाकवे बुद्रुक:
मावळभागामध्ये प्रामुख्याने भात पीक असल्याने बाराही महिने शेतकरी शेतात राबत असतो .हातातोंडाशी आलेला घास झालेल्या पावसामुळे हातातून निघून गेलेला आहे, त्यामुळे शेतकरी राजा चिंताग्रस्त झालेला आहे.
भात पिकावरती बाराही महिने त्या कुटुंबाचा संपूर्ण गाडा चाललेला असतो. तसेच वाढत्या महागाईमुळे शेतमजुरांचे रोजगार हे खूप प्रमाणात वाढल्यामुळे शेतीसाठी शेतमजूर कामास घेणेसुद्धा आत्ताच्या काळामध्ये परवडत नसल्यामुळे शेती करणे सुद्धा खूप अवघड झाले आहे.

तरी संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून झालेले नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, तसेच शासकीय विभागाकडून तुटपुंजी मदत न मिळता कमीत कमी शेतकऱ्याच्या भात पेरणीपासुन ते भात काढणीपर्यंत जेवढा खर्च होतो किमान तरी मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

error: Content is protected !!