तुंग:
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सालाबादप्रमाणे याही वर्षी रात्री दिवे लावून पवन मावळातील तुंग (कठिणगड) दीपोत्सवात उजळून गेला.
मराठा साम्राज्याची साक्ष देणाऱ्या पवन मावळचा घाटरक्षक म्हणुन परिचित असणाऱ्या तसेच हर हर महादेवाची घोषणा ऐकून धीर देणाऱ्या व परकिय आक्रमक थोपवून धरणाऱ्या सह्याद्रीच्या मजबूत अशा तुंग किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला.


त्यात शिवराय व मावळ्यांची वेशभूषा परिधान करून तसेच शिवरायांचे गुणगाण करणाऱ्या घोषणा, त्याचसोबत आकर्षक रांगोळी, प्रेरणामंत्र, पुष्पहार तोरण व मशाली आणि दिवे लावून दीपप्रज्वलनाचे महत्व सांगण्यात आले.तसेचएक दिवा शहाजी महाराजांसाठी,
एक दिवा जिजाऊं माॅ साहेबांसाठी, एक दिवा राजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, एक दिवा छत्रपती शंभूराजे संभाजी महाराजांच्या साठी, एक दिवा शेतकऱ्यांसाठी ,एक दिवा वीरजवानांसाठी असे शेकडो दिवे लावून इतिहासाला उजाळा दिला.


आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो. ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दिवाळीच्या काळात अंधारात ? ही बाब लक्षात घेऊन दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.
प्रतिवर्षी या दीपोत्सवाचे स्वरूप व्यापक होतं, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. .बदलत्या काळात आजच्या तरुणाईला इतिहासाचे भान आणि किल्ल्यांचे महत्व प्रत्येक तरुणाई पर्यंत पोहचावे त्याचसाठी अशा उपक्रमाची आवशकता आहे असे संस्थेचे सदानंद पिलाणे यांनी सांगितले.


सचिन शेडगे यांनी किल्ल्याच्या इतिहासाला उजाळा दिला.. चेतन वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले व मावळ तालुका अध्यक्ष विशाल सुरतवाला यांनी आभार मानले.
राहुल मारणे यांनी शिवरायांची तसेच राजेंद्र सातपुते यांनी मावळ्याची भूमिका साकारली, यावेळी कुंदन भोसले, संपर्क प्रमुख किशोर वाघमारे, विकास वाघमारे,संदीप जाधव, अभिजीत जाधव संदीप गुडीवार भाऊ ढाकोळ, संदीप घोटकुले, सुनीलने वाघमारे, अनिल घोटकुले ओम घोटकुले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!