टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संतोष मोधळे युवा मंच वतीने इंगळूण ग्रुप ग्राम पंचायतीतील नागरिकांना दिवाळी सणा निमित्ताने घरोघरी मिठाई वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदर मावळ अध्यक्ष व ग्राम पंचायत सदस्य संतोष शंकर मोधळे यांच्या तर्फे अनसुटे , मानकुली , कुणे , कुणेवाडी , पारिठेवाडी , इंगळूण तसेच वाडी वस्ती वर जाऊन मिठाई सोबत शुभेच्छा देण्यात आल्या.


संतोष मोधळे म्हणाले,” दिवसभर शेतात राबणा-या माझ्या शेतकरी राजाची दिवाळी ,शेतात राबताना निघाणा-या घामाच्या धारानी अधिक खुलून निघते. या शेतकरी राजाचे तोंड दिवाळीत मिठाईने गोड करायचे म्हणून हा उपक्रम मागील काही वर्षापासून सुरू आहे.शेतकरी राजाच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून काम करायला मोठी उर्जा मिळते.

error: Content is protected !!