पवनानगर :
पुणे जिल्हा भाजपचे कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
घोटकुले यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भूषण, रामायणाचार्य हरिभक्त परायण रामरावजी ढोक महाराज यांचे कीर्तन पवनानगर येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी पंचक्रोशीतील श्रोते नाकरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लॉकडाऊन च्या काळानंतर अनेक भाविकांनी पहिल्यांदाच किर्तनाचा आनंद मिळाला . यावेळी उपस्थित नागरिक टाळ-मृदुंगाच्या तालात तल्लीन झाले होते .अनेक भाविकांनी थेट प्रेक्षपणाच्या माध्यमातून लाभ घेतला.


यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे तसेच तालुक्यातील अनेक आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी बोलताना ढोक महाराज म्हणाले ” , बाळासाहेब यांनी कोरोना काळात शतायु हॉस्पिटल मार्फत केलल्या रुग्णसेवेची कीर्ती आमच्या पर्यंत पोहोचली असल्याचे कीर्तनकार रामराव महाराज ढोक यांनी आपल्या कीर्तनात आवर्जून नमूद केले बाळासाहेब घोटकुले यांनी शतायु हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये खूप सेवा रुग्णांची केले.


माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले,” बाळासाहेब यांनी कोरोना काळात केलेले काम कौतुकास्पद आहे तसेच पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुलाची सर्व जबाबदारी बाळासाहेब घोटकुले यांनी पाहिली होती त्यावेळी तालूक्यात १५०० मंजूर घरापैकी १३०० घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे यामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे लवकरच या घरांचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट योगदान देणारे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!