आळंदी:
कै भिमाबाई बबन कल्हाटकर यांच्या स्मरणार्थ संदिप बबन कल्हाटकर (अध्यक्ष-हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य)यांच्या वतीने आळंदीत वारकरी महिला व पुरूष बांधवाचा सन्मान करण्यात आला.
स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य अलिबागकर महाराज प्रेमवर्धक वारकरी सांप्रदाय रोहा(रायगड) या दिंडीतील गुरुवर्य ह.भ.प.मारुती महाराज कोल्हाटकर यांच्या मार्गदर्शनाने कारवा धर्मशाळा (आळंदी देवाची)या ठिकाणी वारकरी माय-बाप,बंधु-भगिनींना कपडे व साड्या देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.


या निमित्ताने वारकरी माय बापाची सेवा करण्याचे भाग्य मिळाले असल्याच्या भावना संदीप कल्हाटकर यांनी व्यक्त केल्या.
कल्हाटचे उपसरपंच अमोल आगिवले, बाळासाहेब थरकुडे ,.बाळासाहेब ठाकर, अध्यक्ष नवनाथ कल्हाटकर, शंकर आगिवले उपस्थित होते.

error: Content is protected !!