वडगाव मावळ:
हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व
पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ संस्थापक अध्यक्ष संदिप बबन कल्हाटकर व सर्व मित्र परिवार यांच्या सहकार्यने व रतन जैन यांच्या पुढाकारातून अनाथ, वंचित व गरीब भटक्या परिवारांच्या लेकरांची दिवाळी साजरी करण्यात आली.
साई ग्रुप ग्रामपंचायत मधील कातकरी व ठाकर वस्तीवरील लहान मुलांना मिठाई व नवीन कपडे वाटप करण्यात आले. सरपंच रामदास वाघुले, पोलीस पाटील हनुमंत वाडेकर, आदिवासी संघटना मावळचे अध्यक्ष गणपत काटकर,विलास धुमाळ, विनायक कल्हाटकर , नवनाथ कल्हाटकर,नितीन पिंगळे, आदीवासी संघटना अध्यक्ष .विष्णु वाघमारे, ग्रामस्थ बजरंग वाडेकर, लहु वाघुले, .कान्हु पिंगळे, सबाजी पिंगळे उपस्थित होते
error: Content is protected !!