वडगाव मावळ:
दिवाळीचा सण समारंभ आनंदात सुरू आहे, खरेदीला बाजारपेठेत झुंबड उडली आहे. वाहने, दागिने कपडे, मिठाईची खरेदी सुरू आहे. घराघरातील पाकघरात गोडधोड पदार्थाचा बेत रांधतोय. मोठया हौसेने,बाराही महिने पुरेल इतक्या उर्जेची दिवाळी साजरी होत असताना,
अवकाळी पाऊस कधी बरसेल याचा काही नियम नाही,म्हणून बळीराजाची शेतात कामाची लगबग सुरू आहे. कामाच्या धावपळीत त्याला अभ्यंगस्नान असते याचीही कल्पना नाही..कडकडीत पाण्याने अंघोळ करून माझा बळीराजा दिस उगवायला शेताचा बांध गाठतोय.


दिवसभर उन्हात राबून घाम गाळून काम करतोय,त्याची दिवाळी शेतात काम करताना निघणा-या घामातून साजरी होते.धनधान्याची रास पाहून त्याचा ऊर अभिमानाने भरून येतो. त्याच्या पोटाला पोटभर अन्न आणि त्याच्या सर्जाराजाला आणि जितराबाला वैरण झाली की,त्याची दिवाळी आनंदून गेलीच.
सध्या भात पीक काढणीला आले. भात कापनीने जोर धरला .कुठे कुठे कापणी अंतिम टप्या मध्ये आलेली आहे.तसेच अवकाळी पावसाची शक्‍यता असल्यामुळे भात कडून झाल्यानंतर झोडणीचे ही कामे सुरु आहेत.

error: Content is protected !!