कामशेत:
लोकसेवेच्या व्रतात योगदान देणा-या गुणीजणांच्या कर्तृत्वाप्रती खूप आदर आहे, हा आदर शब्दात व्यक्त करणे शक्य नसल्याच्या भावना कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ.विकेश मुथा यांनी व्यक्त केल्या.
येथील कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांचा गौरव करण्यात आला, त्यावेळी डाॅ.विकेश मुथा बोलत होते.
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल धनंजय मिठारे ,आरटीआय कार्यकर्ते संजय पडळकर, सर्पमित्र अनिल आंद्रे, दुर्गसेवक सचिन शेडगे, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता जोशी यांचा विशेष कार्य गौरव सोहळा संपन्न झाला.
तसेच कामशेत पंचक्रोशीतील रुग्णवाहिका चालक कैसर शेख, प्रमोद पवार, योगेश सातकर, प्रभाकर भालेराव, उमेश गोसावी, कैलास मानकर ,कैलास वाघमारे यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कामशेत सह परिसरातील पत्रकार बांधवाचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.


कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टच्या संस्थापिका कांचनबेन मुथा,लालचंद मुथा, रमेश परमार, कामशेत पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस निरीक्षक(रेल्वे)विष्णू गोसावी, पोलीस निरीक्षक (रेल्वे)बाजीराव कडाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका माने ,पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण,गणेश तावरे,शिवसेना तालुका संघटक मीना मुथा, ग्रामपंचायत सदस्य अंजना मुथा, माजी सरपंच रोहिणी मुथा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विकास मुथा यांनी प्रास्ताविक केले. निलेश मुथा यांनी सूत्रसंचालन केले.परेश मुथा यांनी आभार मानले. शिवसेना कामशेत माजी शहराध्यक्ष गणेश भोकरे डॉ. सुदर्शन सावंत ,डॉ. नेहा ओव्हाळ व अन्य जणांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

error: Content is protected !!