सांगावडे:
दिवाळी आणि फटाक्यांची आतिषबाजी हे समीकरण,असे असले तरी फटाक्यांची अशीच अतिषबाजी एका शेतकऱ्याच्या ऊस पेटण्यावर बेतली आहे.
दिवाळीत फटाके उडवून ठिणगी पडल्याने सांगवडे येथील दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे. मावळ तालुक्यातील सांगवडे परिसरात ऊसाची मोठी शेती आहे. या परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांवर नागरिकांची लोकवस्ती आहे .अशाच वस्तीत दिवाळीतील फटाके उडवताना ठिणगी पडली आणि वस्ती लगतच्या उसाच्या शेतीने पेट घेतला .या आगीच शेतक-याचा ऊस जळून खाक झाला
दिवाळी फटाके उडवून ध्वनी प्रदूषण वायु प्रदूषण होत असते.त्याच बरोबर फटाके फोडताना डिणगी उडून असे नुकसान होत असते.सांगवडे तील राहुल बुचडे या शेतकऱ्याचा ऊस पेटून हे नुकसान झाले आहे. फटाके फोडताना योग्य काळजी आणि खबरदारी घेतली अशा प्रकारच्या नुकसानीचे होणार नाही.

error: Content is protected !!