पवनानगर :
धर्मादाय आयुक्तांकडे खोटा ठराव देऊन वाघजाई देवी ट्रस्टची स्थापना केली. तसेच या ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामस्थांची फसवणूक केली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष बाबू केंडे (रा. अजवली, पवनमावळ) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार अनंता खंडू लायगुडे (वय ५०), महेश आबूराव लायगुडे (३७), संतोष पांडुरंग केंडे (४५), संतोष नथू लायगुडे (३०, सर्व रा. अजवली) अशी गुन्हा दाखल झालेली नावे आहेत.
उपनिरीक्षक अनिल लवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी न्यायालयात मंदिर ट्रस्टीबाबत झालेल्या फसवणुकीबाबत फौजदारी अर्ज दाखल केला होता. त्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजवली येथे वाघजाई मंदिर असून, मंदिराची प्राचीन काळापासून लोक देखभाल व पूजाअर्चा करतात.
तसेच देवस्थानच्या नावे शेतजमीन असून त्यापासून उत्पन्न मिळते. देवस्थान कमिटी ही कारभार पाहण्यासाठी एकमताने व बहुमताने जबाबदार व्यक्तींची नेमणूक होते. यातील आरोपी क्रमांक १ हा काही वर्ष जबाबदार व्यक्ती म्हणून काम करत होता. अजवली ग्रामपंचायतने केलेल्या ग्रामस्थांना यातील आरोपी याने संगनमत करून काही ठरावीक लोकांना सोबत घेऊन समस्त ग्रामस्थांची फसवणूक करून वाघजाई देवी ट्रस्ट स्थापन केल्याची माहिती ग्रामस्थांना कळाली.
त्यामुळे फिर्यादी व ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे चौकशी करून कागदपत्रे मिळवली. त्यानंतर त्यावर आक्षेप नोंदविला. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी सदरची नोंदणी रद्द केली. त्यामुळे अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. आरोपी १ याने प्रस्तावित न्यासाचे मालकी वहिवाटीचे मिळकतीचे उतारे, ग्रामपंचायत ग्रामसभेचे प्रोसिडिंग त्यावर ग्रामस्थांच्या सह्या असलेले ठराव व इतर कागदपत्रे दाखल केली होती.

error: Content is protected !!