टाकवे बुद्रुक :
तळेगाव परिवहन मंडळाची लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस आंदर मावळातील खांडी येथे प्रवाशांना घेऊन जात असताना दवणेवाडी येथे चालू एस टी रस्त्यामंध्ये अचानक पणे बंद पडली. मग काय
त्यातील प्रवाशी खाली उतरले. त्यांनी एस.टी.ला धक्का देखील दिला. एस टी काही सुरू होईना.
आंदर मावळ मधिल अनेक नागरिक दीपावली सणाच्या खरेदीसाठी पिंपरी चिंचवड, तळेगाव, वडगाव कामशेत टाकवे बुद्रुक या बाजारपेठांमधून खरेदीसाठी येत असतात. खरेदी झाल्यानंतर पुन्हा परतीच्या मार्गाने माघारी जाण्यासाठी एकमेव साधन परिवहन मंडळाची एसटी आहे.
परंतु रस्त्यावरती परिवहन मंडळाची एसटी बस बंद पडल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला. त्यात जाने येणेचे मुख्य साधन एस टी ती भर रस्त्यात बंद पडल्याने लक्ष्‍मण मोरमारे, मधुकर हेमाडे, यांसह आदि प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!