टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला साकडे घातले आहे,
मावळ तालुका मनसेचे उपाध्यक्ष व इंगळूण ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष मोधळे यांच्या नेतृत्वाखाली या आशयाची निवेदने देण्यात आली.
आंदर मावळ भागातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे झुडुपे काढून साईट पट्टी मोकळी करून द्यावी. नको झाडे काढून टाकावी.अरूंद साईड पट्टी यामुळे काही अपघात झालेले आहेत. भविष्यात मोठा अपघात होऊ नये म्हणून लवकरात लवकर झाडे तोडण्यात यावी व रस्ताच्या कडेला साईट पट्टी करण्यात यावी .असे निवेदन वडगाव मावळ रस्ते बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.


आंदर मावळ भागातील वडेश्वर ते कुसुर खांडी व भोयरे ते सावळा या भागातील गावांना मोबाईल फोन ला रेंज/नेटवर्क नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व विद्यार्थ्यांना देखील ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत हे लक्षात घेऊन तहसीलदार कार्यालय वडगाव मावळ यांना निवेदन देण्यात आले.
आंदर मावळ भागातील अनेक गावांतील विजेचे लोखंडी खांब झीजुन कमकुवत झाले आहे. त्याच प्रमाणे अनसुटे गावातील काही विजेचे पोल हे कमकुवत झाले आहेत. ते जुने खांब बदलण्यात यावे यासाठी महावितरण विभाग वडगाव मावळ विभागाला निवेदन देण्यात आले.
वरील सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील असे आश्वासने तीनही विभागाकडून देण्यात आली आहे.
यावेळी संतोष मोधळे ( उपाध्यक्ष मनसे मावळ तालुका), अशोक कुटे, विजय भानुसघरे , सुभाष करवंदे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!