मावळमित्र न्यूज विशेष:
अगदी नेहमीच आपली अनोखी ओळख निर्माण केलेलं एक हरहुन्नर उद्योजक नेतृत्व श्री.राजेंद्र शंकरराव देशमुख.
ग्रामीण भागात शिक्षणाची उणीव असल्याने मामांच्या आग्रह खातर मामेघरी शिक्षण घेत असताना या तरुणाने उत्तम संस्काराचे ही सर्वोत्तम धडे गिरवले.
उमद्या आणि भरारी नियतीला बहुदा मान्य नसावी. या काळातच या तरुणाच्या कुटुंबावर काळाने घाला घातला आणि त्यांचं पितृछत्र हिरावरून घेतलं. पितृछत्र हरपल्यानंतर शिक्षण अर्ध्यावर सोडून आपल्या कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेतली.
मामेघरी संस्कार, शिक्षण आणि उत्तम शरीरवृष्टी प्राप्त केलेल्या या नवतरुणाने आपल्या कुटुंबाच्या जबाबदारी खातर मुंबई येते माथाडी मध्ये उत्तमरीत्या नोकरी केली.
नोकरी ने गरजा पूर्ण होतात,तर उद्योगाने स्वप्न.
या बहुमोल विचारने प्रेरीत होऊन या तरुणाने गावात उत्तम रित्या पोल्ट्री व्यवसाय,दुग्ध व्यवसाय सुरू केला.
कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना खरंतर त्यांना साथ लाभते ती त्यांच्या सौभाग्यवती कुसुम ताई यांची. डाहुली येथील पिंगळे-देशमुख घराण्यातील ही कन्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांना प्रत्येक कामात अर्धांगिनी च्या रूपाने सहकार्य करत असते.
गावगाड्यात वडिल कै.शंकरराव(मामा) देशमुख यांनी दिलेलं निस्वार्थी योगदान, कमावलेली जिवलग माणसं,दिलेला शब्द हा कटाक्षाने सांभाळण्याची वृत्ती,सुख-दुःखात नेहमी आग्रही राहून सहभाग घेणं या त्यांच्या सर्वच्या सर्व गोष्टीं नित्याने पालन करून हे संस्कार सांभाळणारा तरुण आजही सर्वांमध्ये आपली हटके ओळख सांभाळत आहे.
गत ग्रामपंचायत निवडणूकीत पॅनल प्रमुखाची प्रामाणिक भूमिका सांभाळत संपूर्ण पॅनल निवडून येण्यात त्यांचे मोलाचं योगदान आहे.
कै.शंकरराव(मामांच्या) पाऊल खुणा डोक्यावर ठेवून कार्यरत राहणारा,एकनिष्ठ वृत्ती बाळगणारा हा तरुण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे अशी स्थानिक तरुणांची भावना आहे.

error: Content is protected !!