मळवंडी ढोरे:
मावळचे आमदार सुनील शेळके आणि संत तुकाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिलीप राक्षे मित्र परिवाराच्या वतीने खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे प्रत्येक गावात आयोजन केले आहे. या कार्यक्रमास महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळतोय.
सिने अभिनेत्री पुजा काळभोर आपल्या खुमासदार शैलीत सुत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अधिक प्रोत्साहन देत आहे.
मळवंडी ढोरे येथे मोठ्या जल्लोषात कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य,पोलिस पाटील, गावातील सर्व मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
सरपंच रंजना ढोरे यांनी दिलीप राक्षे यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.एकुण ऐंशी महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.पैठणी मिळवण्यासाठी खेळातील चढाओढाची स्पर्धा बघण्यासारखी होती, व्यासपीठ मिळाले तर महिलाही आपलं कर्तृत्व सिद्ध करुन दाखवतात याचा प्रत्यय दिलीप राक्षे मित्र परिवाराने सुरू केलेल्या स्पर्धेत पहायला मिळत आहे.
कार्यक्रमात प्रियांका संतोष ढोरे या पैठणीच्या विजेत्या ठरल्या.सुरेखा सचिन ढोरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तर हर्षदा दिनेश जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
खेळात सहभागी झालेल्या सर्व माता भगिनींचे अभिनंदन व प्रेक्षक वर्गाचे आभार.कार्यक्रमाला महीलांचा,मुलांचा,गावकऱ्यांचा मिळालेला शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे समाधान जनसेवक दिलीप राक्षे यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!